*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्री गोंदवलेकर महाराज काव्यचारितावली*
*काव्यपुष ९१*
—————————————-
साल एकोणीसशे बारा l हा काळ नव्हता बरा l तब्येतीचा घोर वाढला खरा l श्री महाराजांच्या ll१ ll
वरकरणी तसे ठीक होते l दिनक्रम त्याचे सुरूच होते l
अलीकडे वरचेवर पाय सुजत होते l क्षीणतेमुळे ll २ ll
गोंदवल्यास वर्दळ वाढली l मंडळी फार येऊ लागली l
महाराजांना भेटू लागली l जुनी नवी भक्त सारी ll३ ll
जागा पडू लागली अपुरी l सोयी सुविधा वाटे अधुरी l
बांधकाम आहे आता जरुरी l महाराज करिती विचार ll ४ll
नवी कामे सुरू झाली l विहीर खोदून झाली l सारी कामे
पूर्ण झाली l पाकशाळा,धर्मशाळेसहित ll ५ ll
नवीन शेतीची खरेदी झाली l महाराजांनी गोष्ट एक केली l
शेती वाटून टाकली l सर्व मंदिरांना ll ६ ll
मंदिर संस्थान बनविले l त्यासाठी पंच नेमले l कामे आखून दिले l श्री महाराजांनी ll ७ ll
महाराज बोलती भक्तांना l त्यांना निरोप देताना l विसरू नका नाम घेतांना l कल्याण त्यातच तुमचे हो ll ८ ll
******
करी क्रमशः लेखन कवी अरुणदास ll
—————————————–
कवी – अरुणदास -अरुण वि. देशपांडे – पुणे
—————————————–