You are currently viewing साई पार्क सोसायटीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

साई पार्क सोसायटीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

*साई पार्क सोसायटीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*

पिंपरी
पिंपरी – चिंचवड प्रादेशिक वाहन कार्यालयाजवळ, पेठ क्रमांक ९, मोशी प्राधिकरणातील साई पार्क सोसायटीत ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशप्रेम, एकता आणि सामाजिक उत्तरदायित्व डोळ्यासमोर ठेवून तसेच नेहमी सामाजिक घटकांना केंद्रबिंदू मानून उत्सव साजरा करणाऱ्या साई पार्क सोसायटीत ७८ व्या
स्वातंत्र्यदिवसानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सुभेदार मेजर राजेश कापडे, ब्रेनोब्रेन ॲबॅकस किडस् ॲकॅडमी, पुणे येथील संचालिका स्मिता जाधव, मोशी उप अग्निशमन केंद्र अधिकारी विनायक नाळे, एम आय डी सी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सायबर क्राईम तज्ज्ञ तानाजी बनसोडे, पोलीस अधीक्षक अजय गुळमिरे, सोसायटीचे अध्यक्ष दीपक नाईक, खजिनदार कुणाल भुजबळ, नितीन यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

ध्वजारोहणानंतर विनायक नाळे, प्रदीप भिलारे यांनी अग्निशमन दलाच्या सहकार्‍यांसह आगीच्या दुर्घटना कशा टाळाव्यात याबाबत प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन केले. सध्याच्या काळात गंभीर विषय झालेल्या साबर क्राईमविषयी तानाजी बनसोडे आणि अजय गुळमिरे यांनी सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, फेसबुक वापरताना काय काळजी घ्यावी याविषयी प्रबोधन केले.

याप्रसंगी वक्तृत्व, चित्रकला, निबंध या स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या शर्विल कुलकर्णी, अंगद जाधव, ईशा ढमाले, अथर्व नाईक, स्वरा सोनटक्के, आरुष ठाकूर, रियांश ढमाले या सोसायटीतील विद्यार्थ्यांना तसेच महिलांच्या क्रीडाप्रकारात विजयी ठरलेल्या अनघा जाधव, अनिता देउळकर, रोहिणी यादव, अरुणा सोनटक्के, ललिता होसाळे, दीप्ती नाईक, मीरा कर्डिले तसेच उत्कृष्ट पोशाखाबद्दल दीपाली ठाकूर यांना सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य विष्णू नाईक, रामू सोनटक्के, अशोक कुलकर्णी, शैला कुलकर्णी यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या संयोजनात नवनाथ होसाळे, संग्रामसिंह पाटील, बाळासाहेब पोखरकर, अमोल ठाकूर, धनंजय ढमाले यांनी विशेष मेहनत घेतली. दीपक नाईक यांनी प्रास्ताविक केले. भरत बारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

_____________________________
*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🔸अंदमान – 5 दि – 33,990/-*

*🔹छत्तीसगड – 5 दि – 24,990/-*

*🔸हिमाचल – शिमला मनाली चंदीगड – 7 दि – 28,990/-*

*🔹काश्मीर वैष्णोदेवी – 6 दि – 32,990/-*

*🔸लेह लडाख – 7 दि – 39,990/-*

*🔹नैनिताल मसुरी कोरबेट – 6 दि – 33,990/-*

*🔸अमृतसर – 4 दि – 17,990/-*

*🔹पांडेचेरी कांचीपुरम महाबलीपुरम – 5 दि – 31,990/-*

*🔸हैदराबाद रामोजी फिल्म सिटी – 5 दि – 32,990/-*

*🔹केरळ कन्याकुमारी – 6 दि – 24,990/-*

*🔸इंदोर उज्जैन मांडू – 4 दि – 25,990/-*

*🔹राजस्थान – मेवाड मारवाड – 7 दि – 28,990/-*

*🔸दिल्ली आग्रा – 4 दि – 20,990/-*

*🔹चार धाम – 13 दि – 71,990/-*

*🔸अहमदाबाद वडोदरा स्टॅच्यू ऑफ युनिटी – 5 दि – 22,990/-*

*🔹हम्पी बदामी – 5 दि – 26,990/-*

*🔸अष्टविनायक यात्रा – 3 दि – 11,990/-*

*🔹ओरिसा – 5 दि – 28,990/-*

*🔸सिक्कीम दार्जिलिंग – 7 दि – 39,990/-*

*जीएसटी आणि टीसीएस अतिरिक्त*

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆

*📲 7350 7350 91/ 7350 534 534*

*जाहिरात 
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा