“साईकृपा संस्था” शासकीय पुरस्काराने सन्मानित..*
सिंधुदुर्गनगरी
आज दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल’ या संस्थेस महाराष्ट्र शासनाचा जिल्हा कला व क्रीडा विभागातर्फे जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नाम. दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते देण्यात आला.या संस्थेने दिव्यांगांसाठी उद्योग – व्यवसाय, आरोग्य शिबिरे, कला सांस्कृतिक, रोजगार, क्रीडा स्पर्धा, सामाजिक कार्य इ. कार्यामध्ये उत्तम कामगिरी करून समाजातील असंघटित युवांना संघटित करून तरुणांच्या व नागरिकांच्या सुप्त गुणांना संधी देऊन भरीव योगदान दिले आहे. या कार्याबद्दल संस्थेस जिल्हा युवा पुरस्काराने गौरवण्यात तथा सन्मानित करण्यात आले आहे.
आजच्या कार्यक्रमाला अमिषा मेस्त्री, अरविंद जाधव, शामसुंदर लोट तसेच डॉ. सुनील फडतरे, सुनील जाधव आदी सन्माननीय व्यक्ती व दीव्यांग बांधव उपस्थित होते.