You are currently viewing असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

दिलीप तळेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत केला वाढदिवस साजरा

कणकवली

असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान पं स सदस्य दिलीप तळेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपला वाढदिवस साजरा केला. दिलीप तळेकर हे कायमच सेवाभावी उपक्रमात अग्रेसर असतात.आपल्या आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तळेकर यांनी आपला वाढदिवस दिविजा वृद्धश्रमातील वृद्धांसोबत साजरा केला. वृद्धाश्रमाला १०० किलो तांदूळ, २५ किलो चणाडाळ , २५ किलो मूग ,१० किलो चणे,१० किलो कांदे, १० किलो बटाटे, साखर १० किलो, १ किलो चाहपावडर, ३ किलो हळद, तेल ५ लिटर आदी आदी जीवनावश्यक वस्तू दिल्या. रोख २ हजार रुपये देणगीही दिली.आश्रमातील वृद्धांना भेटवस्तू दिल्या. यावेळी उद्योजक किशोर खाडये, राजेश माळवदे, शैलेश सुर्वे, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, ग्रा.पं. सदस्य दिलीप नावळे, उदय बारसकर, विशाल राणे, चिन्मय तळेकर, मयूर धमक, श्रीराम विभूते आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा