You are currently viewing पिकुळे ग्रामपंचायत येथे हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ग्रामस्वच्छता पथनाट्य सादर

पिकुळे ग्रामपंचायत येथे हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ग्रामस्वच्छता पथनाट्य सादर

पिकुळे ग्रामपंचायत येथे हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ग्रामस्वच्छता पथनाट्य सादर

दोडामार्ग

७८ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेचे विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले ते सर्वांनाच आकर्षण ठरले आहे . ग्राम स्वच्छतेतून समृद्धीकडे या
ग्रामस्वच्छता विषयी प्रबोधन व्हावे त्याचे धडे प्रशाले तून मिळाले तर भावी पिढी निर्माण होऊन देशाचा पर्यायाने राज्य जिल्हा तालुका आणि गाव विकासास हातभार लावला जातो या विषयी जनजागृती ग्रामास्थात व्हावी या उद्देशाने पथनाट्य तून बोध घेण्याचे धडे दिलेआहे यावेळी सरपंच आपा गवस ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,ज्येष्ठ नागरीक माजी सैनिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी शासकीय अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच श्री शांतता माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अनुजा सावंत शिक्षक एन पी कांबळे, पूर्वा गवस विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षिका वेदा मनेरीकर,श्री प्रवीण राठोड नाना गावडे , अशोक आंबुलकर व शिक्षक,पालक अन्य शिक्षक उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर पथनाट्य सादर करताना वेशभूषा सर्वांना आकर्षणाचा विषय ठरला होता या पथनाट्य सादर केले त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे

श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेत भारत सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियान 2024 उपक्रम या अंतर्गत 9 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. 1) 9 ऑगस्ट 2024 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून राजगुरू, सुखदेव भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.2) तिरंगा रॅली तिरंगा ध्वज घेऊन तिरंगा रॅलीचे नियोजन करण्यात आले.3) तिरंगा शपथ- तिरंगा शपथ कार्यक्रम घेण्यात आला.4)तिरंगा Tribute- तिरंगा ट्रीब्युट कार्यक्रमांमध्ये शहीद वीर, स्वातंत्र्य सैनिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.5) तिरंगा रन/मॅरेथॉन- देशभक्ती व राष्ट्रध्वजाचे मूल्य साजरे करण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.6) तिरंगा कॅनव्हास-3:2 या प्रमाणानुसार कॅनव्हास तयार करून त्यावर हर घर तिरंगा,घरोघरी तिरंगा, जय हिंद असे लिहिले.7) तिरंगा देशभक्तीपर संगीत कार्यक्रम- इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी असे गट करून देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली.8) हर घर तिरंगा-13 ते 15 ऑगस्ट तिन्ही दिवशी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला. तसेच प्रशालेत ध्वज फडकविण्यात आला.9) तिरंगा सेल्फी- हर घर तिरंगा अभियानांतर्गत सर्व शिक्षक-शिक्षकांनी तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून वेबसाईटवर अपलोड केले. 10) पथनाट्य व वेशभूषा- हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत ‘जागर स्वच्छतेचा’ हे पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच विविध ऐतिहासिक क्रांतीकारांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा