*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित देशभक्तीपर गीत*
*__तिरंगा__*
स्वातंत्र्याच्या तेजाने भारत माझा झळकला
लाल किल्ल्यावर तिरंगा दिमाखात फडकला ॥ धृ ॥
संग्रामाचे शिंग फुंकले हाती हत्यार घेतले
छातीवर वार झेलुनी देशास स्वातंत्र्य दिधले
स्वातंत्र्याच्या संग्रामाने हिंदुस्थानी भडकला ॥ १ ॥
घराघरांत रोषणाईने दिवे उजळले स्वातंञ्याचे
गीत गायीले उत्साहाने स्वातंत्र्याच्या जल्लोषाचे
स्वातंत्र्याच्या प्राप्तीचा नाद गगनी धडकला ॥ २ ॥
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी भारत माँ ला वंदूया
वाहू श्रद्धांजली हुतात्म्यास बलिदान त्यांचे आठवूया
घराघरांच्या शिखरावरती तिरंगा तेजाने फडकला ॥३ ॥
*✒️© सौं आदिती धोंडी मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*