You are currently viewing तिरंग्याचा अभिमान

तिरंग्याचा अभिमान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती वाघमारे लिखित अप्रतिम देशभक्तीपर काव्यरचना*

 

*तिरंग्याचा अभिमान*

 

शूरवीरांचे करून स्मरण,गाऊ स्वातंत्र्याचा गाणं .

एक मुखाने बोला, जय जय भारत देश महान.

 

ध्वजारोहणासाठी ,घेऊ तिरंगा हाती

खूप पवित्र आहे, भारत भूमीची माती.

 

मराठी वीरांचे संघर्ष, साक्ष स्वातंत्र्याची देतात

करून जयघोष स्वातंत्र्याचा, तिरंगा हाती घेतात .

 

चला आपण सारे,येऊ पुन्हा एकत्र.

अनेक वीरांच्या बलिदानाने, झाला भारत देश स्वतंत्र .

 

शूरवीरांचे करून स्मरण ,तिरंगा हाती घेऊ .

जातीपाती वर्णभेद, सर्व झुगारून देऊ

 

स्वातंत्र्य झाला देश ,तेव्हा सण साजरे झाले .

घेऊन हाती तिरंगा, कौतुक पराक्रमी विरांचे केले .

 

झगडले झुंजले सारे ,परवा नाही केली .

देश स्वतंत्र्यासाठी, प्राणाची आहुती दिली .

 

असे अनमोल हिरे पुन्हा ,कधी होणे नाही

15 ऑगस्ट हा दिवस ,स्वातंत्र्याची देतो नाही ग्वाही

 

तिरंगा आहे ,भारत देशाची शान

देश स्वतंत्र झाला ,मज स्वातंत्र्याचा अभिमान

 

जाती भेद वर्ण नष्ट करून, फुलवू नंदनवन

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या शूर भूमिपुत्रांना माझे त्रिवार वंदन, त्रिवार वंदन.

 

 

सौ भारती वसंत वाघमारे

मंचर

तालुका आंबेगाव

जिल्हा पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा