You are currently viewing एकनाथ डवले : शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर

एकनाथ डवले : शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर

(दिनांक 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट संपूर्ण महाराष्ट्रात महसूल पंधरवाडा संपन्न होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील काही सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांचा परिचय करून देण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न)

 

आज मुंबईला मंत्रालयात मुख्य सचिव अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव उपसचिव असे अनेक अनेक अधिकारी आहेत.. मंत्रालयातील काही अधिकारी त्यांच्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीमुळे सदैव चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची नोंद समाज माध्यमावर तसेच वर्तमानपत्र द्वारे लोकांपर्यंत पोहोचत असते.. अशाच एका प्रधान सचिवाचे नाव आहे श्री एकनाथ डवले.. डवले साहेबांचे विशेष म्हणजे ते नुसतं आयएएस अधिकारी झाले नाहीत. तर माझ्या मुलाखत घेणाऱ्या समितीला नवलच वाटले. एवढा चांगला उच्च विद्या विभूषित मुलगा. शेती करतो म्हणजे खूप झाले. त्यांनी मग त्यांना शेतीतलेच प्रश्न विचारले. डवले साहेब खरोखरच शेती करत होते ..त्यामुळे त्यांनी अतिशय समर्पक व यथार्थ उत्तरे दिली .त्या मुलाखतीवरच त्यांचे आयएएस साठी सिलेक्शन झाले. तेव्हा शेतकऱ्याच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या.. समितीने विचार केला हा मुलगा तळागाळातून आलेला आहे .शेतकऱ्यांचे प्रश्न त्याला माहित आहेत .त्यामुळे हा मुलगा शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल. आणि खरोखरच आजवरची त्यांची कार्यकीर्द पाहिली की आपल्याला त्याची जाणीव होते की या माणसाने शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. माझी त्यांची भेट पहिली भेट वाशिमला ते मुख्य कार्यकारी अधिकारी असताना झाली. मी त्यांच्या वाशिमच्या घरी गेलो. तेव्हा वाशीम नवीनच जिल्हा झाला होता. अधिकाऱ्यांचे घर बांधून व्हायचे होते .साहेब भाड्याने रिसोड रोडवर प्राध्यापक कॉलनीत राहत होते .साहेबांनी अतिशय चांगले स्वागत येथे केले आणि मला स्पगावातील माझ्या आसपासच्या गावातील मुलगा देखील स्पर्धा परीक्षेला बसला पाहिजे. माझ्यासारखा अधिकारी झाला पाहिजे. यासाठी त्यांनी त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील माळवंडी गावातच अतिशय चांगले असे ग्रंथालय व अभ्यासिका प्रारंभ केली .ते लोक होते वेगळे गर्दीत जे गेले पुढे .मी मात्र मागे वळूनी पाहतो मागे किती जण राहिले .या न्यायाने त्यांनी आपले जन्मभूचे ऋण फेडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. ज्या बुलढाणा जिल्ह्यातील माळवंडी गावात ते शिकले लहानाचे मोठे झाले .त्या गावात ग्रंथालय आणि अभ्यासिका स्थापन करून आपल्या गावाच्या ऋणातून उतराई होण्याचा त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नाला सलाम. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यामुळे साहेब नेहमी चर्चेत राहिले आहेत. आयएएस अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त प्रधान सचिव अशा मोठ्या मोठ्या पदावर काम करणारा करणारे श्री एकनाथ डवले हे अजूनही जमिनीवरच आहेत आणि राहणारही आहेत. शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा त्याचा अभिमान आहे .म्हणूनच ते जेव्हा आय ए एस ची पहिली परीक्षा पास झाली दुसरी परीक्षा पास झाले आणि मुलाखतीला गेले तेव्हा मुलाखत समितीने त्यांना विचारले मिस्टर डवले अभि आप क्या काम कर रहे हो. त्यांनी आत्मविश्वासाने उत्तर दिले .सर अभि मै खेती कर रहा हुं.. कमिटीलार्धा परीक्षेची काही पुस्तके पण आमच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या विद्यार्थ्यांसाठी दिले. आणि मला सांगितले काठोळेसर मी अमरावतीला आलो की तुमच्या संस्थेला भेट देतो. हे नुसते म्हणून साहेब थांबले नाहीत .तर एक वेळची गोष्ट आहे. साहेब अमरावतीला विभागीय आयुक्तांनी बोलाविलेल्या सभेला येणार होते. अमरावतीला निघताना त्यांनी मला फोन केला आणि सांगितले काठोळेसर मी अमरावतीला विभागीय आयुक्तांच्या सभेला येत आहे. सभा आठवड्यानंतर मी तुमच्या ग्रंथालयाला व अभ्यासिकेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे .त्यांना मार्गदर्शन करणार आहे. साहेबांनी आठवण ठेवून मला फोन केला होता.. ढवळे साहेब अकोला येथे जिल्हाधिकारी असताना त्यांनी इतके चांगले काम केले की आदर्श जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव आले. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख हे होते. त्यांनी असा जिल्हाधिकारी आपल्या लातूरला असावा असा अट्टाहास धरला आणि तो पूर्णत्वाला नेला. अकोल्यावरून साहेब लातूरला जिल्हाधिकारी म्हणून गेले . आणि लातूर शहरात आणि जिल्ह्यात त्यांनी आपल्या कामामुळे स्वतःची आगळीवेगळी छबी तयार केली .नाशिकला विभागीय आयुक्त असताना त्यांनी केलेले कार्य अजूनही नाशिक विभागातील लोकांच्या लक्षात आहे .मंत्रालयामध्ये कृषी विभाग जल संपदा विभाग यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे इतके कामे केली की ती कामे मैंलाचे दगड ठरले आहेत. एकनाथ डवले यांनी जी कामे वेगवेगळ्या पदावर असताना केलेली आहेत ते निश्चितच लोकाभिमुख आहेत .साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या विचाराने हा माणूस भारावलेला आहे व राहणारही आहे. अशा या तेजस्वी व कृतिशील सनदी अधिकाऱ्याला महसूल पंधरवडा निमित्त हार्दिक शुभेच्छा.. !

प्रा. डॉ.. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आय ए एस

अमरावती कॅम्प.

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा