*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तिरंगा*
गगनामध्ये फडफडणारा देशाची हा जान तिरंगा
लाखो कोटी नागरिकांच्या अभिमानाचा मान तिरंगा
बंधनातुनी झाली मुक्ती शतकभराच्या अंधाराची
उच्चरवाने गातो आहे स्वातंत्र्याचे गान तिरंगा
सफेद,हिरवा,निळा,केशरी रंग शोभती झेंड्यावरती
समानतेचे मूल्य शिकवतो प्रतिकांचे हे भान तिरंगा
अशोकचक्रा मधून सांगे वेग प्रगतिचा देशभराचा
सत्य, अहिंसा, शांति प्रितीचे जगास देतो पान तिरंगा
त्यागाचा हा रंग केशरी अमरत्वाला नमन करावे
मनापासुनी वंदन करतो हातामध्ये छान तिरंगा
श्रीनिवास गडकरी
रोहा पूणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित