You are currently viewing कुडाळ पंचायत समितीच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅली…

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅली…

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅली…

कुडाळ

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला “हर घर तिरंगा” अंतर्गत आज कुडाळ शहरात पंचायत समितीच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी “भारत माता की जय”, वंदे मातरम्” आदी घोषणाने परिसर दणाणून गेला.

पंचायत समिती कुडाळ येथून हर घर तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली पंचायत समिती ते कुडाळ बस स्थानक अशी काढण्यात आली.

या रॅलीत गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, गट शिक्षण अधिकारी संदेश किंजवडेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी गीता चेंदवणकर, कृषी अधिकारी बाळकृष्ण परब, प्रमोद मुणगेकर, संजय ओरोसकर, रवी पवार, महादेव तेली, महादेव खरात, दत्ताराम आंबेकर, धनश्री परब व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा