सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज करा
सिंधुदुर्गनगरी
गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवडीबाबचे निकष 31 जुलै 2024 च्या शासन निर्णयात नमूद आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.
सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांने करावयाच्या अर्जाचा नमुना शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ येथे आहे. इच्छुक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पु.ल. देशापांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर 31 ऑगस्ट 2024 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या निवड समिती प्रत्यक्ष उत्सव स्थळी भेट देतील तसेच मंडळांकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील जिल्हास्तरीय समिती कडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणाकण करण्यात येईल.
जिल्हास्तरीय निवड समिती जिल्ह्यातून प्रत्येकी 1 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्याचे नावे सर्व कागदपत्र, व्हीडीओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत सादर करण्यात येतील.
राज्यातील पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुढीलप्रमाणे अनुक्रमे प्रथम क्रमांक 5 लाख, व्दितीय क्रमांक 2 लाख 50 हजार, तृतीय क्रमांक 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार येईल. राज्यस्तरीय निवड समितीकडे जिल्हास्तरीय निवड समितीने निवड केलेल्या 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी 3 विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रूपये चे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
दिनांक 31 जुलै 2024 च्या शासन निर्णय शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी या बाबत काही शंका असल्यास अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती कार्यालय दूरध्वनी क्र. 02362 228849 वर संपर्क साधावा.