सावंतवाडीतील न्यायालयीन इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन
सिंधुदुर्ग नगरीतील जनता दरबारात वकिल संघटनेने घेतली भेट
सिंधुदुर्ग
सावंतवाडी येथिल सध्यस्थितीमध्ये अस्तीत्वात असलेली न्यायानलयीन इमारत ही संस्थानकालीन न्यायालयाची इमारत आहे. मात्र,अलीकडच्या काळात वाढलेली वकील संख्या व न्यायालयीन कामकाजाचे स्वरूप लक्षात घेता सदर इमारत ही फारच अपुरी ठरत असल्याने सावंतवाडी शहरात न्यायालयाची नवीन इमारत उभी करण्यासाठी आवश्यक असलेली पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे आज झालेल्या जनता दरबारात वकील संघटनेने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. यावेळी याबाबत निश्चितच पाठपुरावा करून सावंतवाडी न्यायालयीन इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
सावंतवाडीत सद्यस्थितीत मोती तलावाच्या बाजूला असलेल्या न्यायालयीन इमारतीची जागा अपुरी पडत असल्याने त्याचे पडसाद न्यायालयीन कामकाजावर व पर्यायाने वकीलांच्या कामकाजावर पडत असल्याने बऱ्याच समस्यांना त्याची झळ पोहचते. याकरीता सातत्याने वकील संघटनेकडुन नविन इमारतीच्या बांधकामसाठी सोयीस्कर जागा मिळावी यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात आलेली होती. जिल्हा न्यायालय प्रशासन विभाग, सिंधुदुर्गनगरी यांच्यावतीने देखील शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता.
सावंतवाडीतील शासकीय गोदामासमोर अतिरीक्त सत्र न्यायालयाची जमीन आजही न्यायालयाच्या ताब्यात आहे व त्याठीकाणी न्यायालयीन इमारत व्हावी याविषयी वकील वर्ग आग्रही होते. परंतु मा. उच्च न्यायानयाच्या नियमावलीनुसार सर्व सुविधांसहीत न्यायालयीन इमारत व न्यायाधिश निवासी इमारत बांधण्यासाठी सदर जागा ही अपुरी असल्याचा अभिप्राय प्रधान वास्तु विशारद मुंबई यांनी आपला दिलेला असल्याने दुसरी पर्यायी जागा सोईस्कररित्या उपलब्ध होणे आवश्यक होते.
त्यानुसार वकील संघटनेने पाठपुरावा केला असता सावंतवाडी पोलिस स्टेशन नजीक अस्तीत्वात असलेली आय. टी. आय. (शासकीय तंत्रनिकेतन) यांच्या अखत्यारीतील जागा ही रिक्त असुन सदर आय. टी. आय. प्रशासन हे मौजे कोलगांव येथे हलविण्यात आलेले आहे. त्यामुळे ती जागा मे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुबलक असल्याने तसेच पोलिस स्टेशन, कारागृह, तहसिलदार कार्यालय यांच्या परिसरात सोईस्कररीतत्या उपलब्ध होणारी असल्याचे निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक व सावंतवाडी तालुका संघटनेच्या अध्यक्षा ॲड. निता कवीटकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सिंधुदुर्गनगरी येथिल जनता दरबारात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन न्यायालयीन इमारतीच्या जागेसाठी मागणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी वकील संघटनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना मंत्रालय स्तरावर तंत्रनिकेतन विभाग, महसुल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत आवश्यक त्या परवानग्या व कार्यवाही जलद गतीने होण्याचे आश्वासन दिले व त्या धर्तीवर आदेश पारीत केले.पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेबाबत सावंतवाडी वकील वर्गाकडुन मंत्री महोदयांचे आभार मानण्यात आले व समाधान व्यक्त करण्यात आले.
या वेळी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष सौ. निता कवीटकर, ॲड. शामराव सावंत, ॲड. संदीप निंबाळकर, ॲड. डि. के. गावकर, ॲड. निलीमा गावडे, ॲड. राजेश पराडकर, ॲड. स्वप्नील कोलगावकर, ॲड. संकेत नेवगी, ॲड. रश्मी नाईक, ॲड. अमिषा बांदेकर, ॲड. दत्तप्रसाद ठाकुर, ॲड. कौस्तुभ गावडे आदी वकील उपस्थित होते.
______________________________
*संवाद मिडिया*
👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻
*आ देखें जरा..किसमें कितना है दम…*
💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼
*बॅक 2 बॅक टेस्ट ड्राईव्ह चॅलेंज*
तुम्ही घेत असणारी कोणत्याही कंपनीची कार
आणि टाटा पंच
यांची २०किमी ची *बॅक 2 बॅक* टेस्ट ड्राईव्ह घ्या
आणि मगच कोणती कार खरेदी करायची आहे ते ठरवा.
*तुम्ही बघत असलेल्या कार चा विक्रेता तयार आहे का हे चॅलेंज स्विकारायला..??*
✅आम्ही तयार आहोत..
मग विचारा तर *है क्या दम…???*
स्वातंत्र्य दिन निमित्त ₹.२७०००/-* पर्यंत चे विषेश ॲाफर सहीत..
*ऑफर्स १५ ॲागस्ट पर्यंत वैध*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*रतनजी टाटा यांचे संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आजच भेट दया अथवा कॅाल करा..!!
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377959595*
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*