You are currently viewing मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चौकूळ कबुलायतदार- गावकार प्रश्नावर काढणार तोडगा. – दीपक केसरकर

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चौकूळ कबुलायतदार- गावकार प्रश्नावर काढणार तोडगा. – दीपक केसरकर

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चौकूळ कबुलायतदार- गावकार प्रश्नावर काढणार तोडगा. – दीपक केसरकर

१४ तारखेला मुंबईत ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक…

सावंतवाडी

चौकुळ कबुलायतदार -गावकर जमीन प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री विश्रामगृह मुंबई येथे १४ ऑगस्टला बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
चौकुळ येथील ग्रामस्थांनी १५ ऑगस्टला कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी ग्रामस्थांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. गेळे आणि आंबोली जमिनी वाटप करण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे.मात्र खाजगी वन – वनसंज्ञा जमिन आणि शासन जमीन एकत्रितपणे वाटप करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शासनाच्या नावे असलेल्या जमिनी वाटप करण्याचे थांबले आहे. वनसंज्ञा आणि शासन नांवे असलेली जमीन एकत्रितपणे वाटप करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
चौकुळ येथील ग्रामस्थांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत होत आहे. त्यावेळी निश्चितच सकारात्मक निर्णय होईल, असे केसरकर यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा