You are currently viewing “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन!”

“पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन!”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*“पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन!”* 

 

अहिल्याबाई तत्त्वज्ञानी महाराणी विख्यात

पुण्यश्लोक राजमाता होळकर ज्ञातIIधृII

 

जन्म जाहला जामखेड-चौंडी खेड्यात

माता सुशीलाबाई पिता माणकोजी होत

पती खंडेराव होते वीर योद्धा प्रसिद्धII1II

 

माळवा प्रांताच्या राजमाता शस्त्र पारंगत

माळवा प्रांत सांभाळीत श्र्वशुरांचे पश्चात

सैन्याचे नेतृत्व करती युद्ध निपूणII2II

 

न्यायदानासाठी अहिल्याबाई सुप्रसिद्ध

मंदिरे नद्या घाट बांधले भारत वर्षांत

उद्योजकता जपली रोजगार केला निर्माणII3II

 

महेश्वर इंदूर उजैनला बनवले सुंदर

द्वारका काशी वैजनाथांचा केला जीर्णोद्धार

सोमनाथी शिवमंदिर केले प्रस्थापितII4II

 

कल्याणकारी केले कार्य जपले प्रजाहित

आदर्श सम्राज्ञी किताब लौकिक महान

आदर्श पतिव्रता लोकप्रिय शिवभक्तII5II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा