*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्दभारती ! मा…भारती..!*
अक्षरांना माझ्या
कोणती जात नाही
शब्दांना माझ्या
कोणता धर्म नाही ..!
हात छातीशी बांधलेकी
शब्द विस्तव जाळतात
आशय दुमडून बसलाकी
शब्द आसूड उगारतात ..!
शब्दभारतीला करूणेचा पार
रोधल्या श्वासात लागली आस
कवळण्या या जगाचे आवार
शब्दांना लाभे ब्रम्हांडाची कास..!
शब्द झाले वृक्ष!बोल झाली पाखरे
मीच माझ्या आत शब्दांचे दाणे पेरले
मीच शब्दांचा पूर!मीच शब्दांचा काठ
जे शब्द माझे नव्हते तेही फुलाया लागले
जे शब्द सदा होते माझे
ते या शब्दभारतीने नव्याने पाहिले
गर्भारूनी पोरक्या शब्दांना धराया
मा भारतीचे मुके मौन दाटून आले .!!
मा…भारतीचे मुके मौन दाटले…!!
बाबा ठाकूर धन्यवाद