You are currently viewing विवेक निमाला

विवेक निमाला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अंजना कर्णिक लिखित अप्रतिम सामाजिक लेख*

 

*विवेक निमाला*

 

याच आठवड्यात वारंवार घडलेले स्त्री वरील बलात्कार आणि तिची हत्या या गुन्ह्यांनी मनाची शांती पार उध्वस्त झालीय. दडपण आणि भय या भावना शिगेला पोचल्यात. मुलींच्या, सुनांच्या सुरक्षितते बद्दल चिंता वाढून पालकांची झोप उडालीय.

 

हल्ली एकूणच भारतीयच असं नाही तर सर्वच समाजामध्ये पिसाट वृत्ती आणि त्यातून वाढणारे भयानक गुन्हे यात वाढ होतं चालली आहे. किंबहुना यातलं गांभीर्य, अधोगती स्त्रियांचा सन्मान जिवीतहानी या बद्दलची संवेदनशीलता नाहीशी झालीय.

याला कारण उत्तान चित्रपटांची निर्मिती, स्त्री पुरुष मॉडेल्स चे हिडीस अंग प्रदर्शन करणाऱ्या जाहिराती, U tube वरच्या क्लिप्स, सारासार विचार न करता fb, insta वर load केले जाणारे रील्स, कोणत्याही वयातील व्यक्तीला अगदी लहान मुलांना देखील सहज उपलब्ध होतील अशा porn films, books या मुळे sex , आणि ती कामना

भागवण्यासाठी स्त्री देहाची गरज, तो कसाही उपलब्ध करून घेणे ही लागत वाढती चटक अतिशय भयावह अवस्थेला पोचलीय.

हिंसा आणि क्रूरता याच देखील तरुण पिढीला काही वाटेनासं झालंय. कारण TV मालिका, OTT वरचे हिंसक चित्रपट याच हिंसेंच उदात्तीकरण करतात. पालक आपल्या लहान मुलांसह एकत्र बसून हे असले चित्रपट,मालिका, रील्स बघतात. त्या मुळे कोणत्याही गुन्ह्याबद्दल चीड येणं, त्या विरुद्ध एकवटून परिवर्तन घडण्यासाठी काही चळवळ करणं हे सारं केव्हाच मागे पडलंय. गुन्ह्यात बळी गेलेल्या व्यक्तीबद्दल, स्त्री बद्दल वाईट वाटते. पण तेव्हड्या पुरतंच. बाकी मला काय त्याचे! माझ्या कुटुंबातील सर्व तर सुरक्षित आहेत ही स्वार्थी विचारसरणी रुजत चालली आहे.या बाबतीत जे पोलीस तपास होतात त्यामधेही भ्रष्टाचार शिरलाय. तपासात हेतूपूर्वक त्रुटी ठेवल्या जाताहेत आणि विलंब केला जातोय. राजकीय हस्तक्षेप अटळ असतोच. मग बाधित कुटुंबाला न्याय मिळणार कसा आणि कधी? तात्पुरता जागा झालेला स्त्री वर्ग आणि सज्जन समजवर्ग देखील या गुन्ह्यांची तीव्रता विसरून जातोय. या बाबतीत खरं तर केवळ करमणूक आणि पोकळ व्यख्यानें यात न अडकता स्त्री सन्घटना, कॉलेज मधील युवती यांनी एकत्र येऊन बलात्कार आणि हत्येविरोधी चळवळी चालू करणं गरजेचं आहे. आपण काय करणार यात असा कातडी बचाव मार्ग उद्या अंगाशी येईल.

 

 

@अंजना कर्णिक

प्रतिक्रिया व्यक्त करा