बांद्यातील रंगभरण व शालेय निबंध स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद…
बांदा
येथील कै. सुरेश महादेव कल्याणकर यांच्या स्मरणार्थ गुरुदत्त कल्याणकर यांनी बांदा दशक्रोशीतील जिल्हा परिषद मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या रंगभरण व शालेय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पहिली ते चौथी गटासाठी रंगभरण तर पाचवी ते सातवी गटासाठी शालेय निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास भेटवस्तू व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या दोन्ही स्पर्धा बांदा जिल्हा परिषद केंद्र शाळा क्र. १, बांदा प्राथमिक शाळा निमजगा क्र. २, जिल्हा परिषद शाळा सटमटवाडी, भालावल, कोनशी, तांबोळी, असनिये, घारपी, पडवे माजगाव, डोंगरपाल, नेतर्डे, डिंगणे नं. १, डिंगणे धनगरवाडी नं २, गाळेल या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या. दोन्ही स्पर्धाना मुलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. लवकरच पारितोषिक वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजक गुरुदत्त कल्याणकर यांनी सांगितले.
श्री कल्याणकर म्हणाले कि, मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यात व्यापक स्वरूपात या स्पर्धा घेण्यात येणार आहे. दशक्रोशीतील सर्व शाळांमधील शिक्षकांनी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.