You are currently viewing सिंधुदुर्ग मार्केट यार्ड चे स्वप्न पूर्ण ; नांदगाव रेल्वे स्टेशनलगत 5 हेक्टर जमीन केली खरेदी

सिंधुदुर्ग मार्केट यार्ड चे स्वप्न पूर्ण ; नांदगाव रेल्वे स्टेशनलगत 5 हेक्टर जमीन केली खरेदी

सिंधुदुर्ग मार्केट यार्ड चे स्वप्न पूर्ण ; नांदगाव रेल्वे स्टेशनलगत 5 हेक्टर जमीन केली खरेदी

2025 च्या हंगामात सिंधुदुर्ग मार्केट यार्ड मध्ये होणार शेतमाल खरेदी- विक्री

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसह दरडोई उत्पन्नवाढीला मिळणार चालना

सिंधुदुर्ग

खासदार नारायण राणे यांच्या मनात सिंधुदुर्ग वासीयांचे दरडोई उत्पन्न राज्यात पहिल्या 5 क्रमांकात आणायचा विचार असतो. त्याच अनुषंगाने जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे.सिंधुदुर्ग चे अर्थकारण काजू आंबा मासेमारी पर्यटन यावर आधारित आहे.जिल्ह्याचे उत्पन्न वाढवायचे असेल तर मच्छीमार, शेतकऱ्यांना ताकद देणे गरजेचे आहे.यासाठीच जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांसाठी एपीएमसी मार्केट मध्ये इथला आंबा गेल्यानंतर दलालांच्या विळख्यात शेतकरी सापडतो आणि मिळेल तो भाव पदरात पाडून घ्यावा लागतो.अंतरराष्ट्रीय पातळीवर देवगड हापूस ला भलीमोठी मागणी आणि किंमत असूनही एपीएमसी मार्केट मधील दलालांमुळे आंबा बागायतदरांचे आर्थिक नुकसान होते. आंबा हे नाशवंत पीक असल्यामुळे योग्य वेळेत आंबा विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एपीएमसी मार्केट शिवाय पर्याय आजपर्यंत नव्हता. स्थानिक आंबा बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी यावर कायमचा उपाय करण्यासाठी एपीएमसी च्या धर्तीवर कोकणातील पहिले मार्केट यार्ड सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगाव रेल्वे स्टेशन लगत उभारत असल्याचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सहकार्याने लवकरच काही महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मार्केट यार्ड अस्तित्वात येईल. या मार्केट यार्ड प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडून त्यांचे राहणीमान उंचावेल असे आमदार राणे म्हणाले. याबाबत बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले की नांदगाव परिसरात मार्केट यार्ड उभारणीच्या 5 हेक्टर पेक्षा जमीन खरेदी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीला कर्जपुरवठा केला आहे. माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. देवगड वेंगुर्ला हापूस मध्ये कर्नाटक हापूस ची होणारी भेसळ यामुळे रोखली जाणार आहे. सिंधुदुर्ग मार्केट यार्ड चे येत्या काही दिवसांत भूमिपूजन केले जाणार असून 2025 च्या आंबा हंगामापासून या मार्केट यार्ड मध्ये शेतमाल खरेदी विक्री चे व्यवहार सुरू होणार असल्याचेही जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे म्हणाले की विद्यमान खासदार नारायण राणे यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व सोयीसुविधानी युक्त असे एपीएमसी च्या धर्तीवर रेल्वे स्टेशन लगत मार्केट यार्ड उभारण्याची सूचना केली होती. नांदगाव रेल्वे स्टेशनलगत 5 हेक्टर जमीन पावणे दोन कोटी रुपये दराने खाजगी जमीन मार्केट यार्ड साठी खरेदी केली असून पणन मंडळा च्या सर्व परवानगी घेऊन लवकरच मार्केट यार्ड चे भूमिपूजन केले जाणार आहे.

यासाठी पणन मंडळाकडून पतपुरवठा केला जातो मात्र यासाठी लागणारा विलंब लक्षात घेत राणे साहेबांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून अर्थपुरवठा घेण्यात आला आहे. माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी मार्केट यार्ड चे पाहिलेले स्वप्न आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होत आहे असे तुळशिदास रावराणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा