लाडकी बहीण योजनेच्या १ लाख ४४ हजार अर्जांना जिल्हास्तरावर मंजुरी…
जिल्हा प्रशासनाची माहिती; ५ हजार ५६८ अर्जात त्रुटी, ५३१ लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र…
सावंतवाडी
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शंभर टक्के अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यातील १ लाख ४४ हजार ८७४ अर्ज राज्यस्तरावर पाठवण्यात आले आहे. यातील ५ हजार ५६८ अर्जात त्रुटी असल्याने ते पूर्ततेसाठी परत पाठवण्यात आले असून जिल्हाभरातून ५३२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्यात सावंतवाडीत तालुक्यातील अर्जांची संख्या मोठी आहे.
शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या योजनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महिलांकडून सादर करण्यात आलेले अर्ज पुढील मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.