You are currently viewing पोलिस भरतीत ई.डब्ल्यू.एस.अंतर्गत मराठा किती ?

पोलिस भरतीत ई.डब्ल्यू.एस.अंतर्गत मराठा किती ?

पोलिस भरतीत ई.डब्ल्यू.एस.अंतर्गत मराठा किती ?

*आमदार नितेश राणे यांनी वस्तुस्थिती दर्शक यादी आणली बाहेर

*मराठा समाजाचे आंदोलन हे माराठ्यांसाठीच हवे,कोणा तिसऱ्यांसाठी नको; आमदार नितेश राणे यांनी सुनावले

कणकवली

नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत मराठा समाजाच्या मुलांना ई.डब्ल्यू.एस.च्या आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही. बीड जिल्ह्यात ई.डब्ल्यू.एस. कोट्यातून सगळे उमेदवार मुस्लिम समाजाचे भरती झाले.त्यात एकही मराठा उमेदवाराला भरती होता आले नाही. याची सत्यता आणि वस्तुस्थिती आमदार नितेश राणे यांनी आज समाज माध्यमांसमोर आणली. मराठा समाजाचे आंदोलन हे मराठा समाजातील मुला बाळांसाठीच हवे ते राजकारणासाठी नको. तुमच्या आंदोलनाचा फायदा मराठा समाजाला होत नसेल तर त्याचा उपयोग काय.? ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणे लावून तिसऱ्याच समाजाला फायदा देण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आपण गप्प बसणार नाही असा इशाराच भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी दिला.
भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत पोलीस भरतीत इ.डब्ल्यू.एस चा फायदा मुस्लिम समाजाच्या लोकांनी घेतला मात्र मराठा समाजाच्या लोकांना तो झाला नाही. याची पोलखोल बीड जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक तथा निवड मंडळाचे सचिव असलेल्या उमाशंकर कस्तुरे यांनी जाहीर केलेल्या भरती उमेदवारांची यादी देत पुराव्यानिशी केला. या यादीत ई.डब्ल्यू.एस अंतर्गत जे उमेदवार भरती झाले ते सर्व मुस्लिम समाजाचेच कसे आहेत. ई डब्ल्यू एस मध्ये एकही उमेदवार मराठा समाजाचा आला नाही. मग मराठा समाजाचे सुरू असलेले आंदोलन मराठा समाजाच्या फायदा होत नसेल तर ते कोणासाठी आहे. असा संतप्त सवाल आमदार नितेश राणे यांनी केला.
मनोज जरांगे पाटील मराठा समाजाबद्दल बोलतील मराठा आरक्षणाबद्दल जेव्हा जेव्हा बोलतील त्यावेळी आमचा पाठिंबा मराठा आरक्षणासाठी असेल. कारण आम्ही सुद्धा मराठा म्हणून राजाच्या कानाकोपऱ्यात जाऊन सभा,बैठका घेतलेल्या आहेत. आंदोलने केलेली आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे दुःख आणि आरक्षणाची गरज आम्हाला माहिती आहे. मात्र जरांगे पाटील यांची भाषा राजकीय असेल आणि ती फक्त भाजप आणि फडणवीस साहेब व टीका करत असतील. तर त्यांना तशाच पद्धतीने राजकीय उत्तर मिळेल. जरांगे पाटील हे नेहमी फडणवीस आणि भाजपवर खालच्या भाषेत बोलतात. हीच भाषा महाविकास आघाडी तील नेत्यांबद्दल किंवा पक्षाबद्दल ते बोलत नाहीत.त्यामुळे जेव्हा तुम्ही समाजाबद्दल बोलाल तेव्हा समाजासोबत आम्ही असू राजकीय बोलाल तेव्हा राजकीय उत्तर देऊ असा इशाराही यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा