मालवणात १४ ऑगस्टला सन्मान देशभक्ताचा
मशाल फेरी तिरंगा रॅली…
मालवण
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला १४ ऑगस्टला स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा राष्ट्रीय छात्रसेना विभाग आणि मालवण पालिका, यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ४.३० वाजता सन्मान देशभक्ताचा व मशाल फेरी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत डॉ. पंकज दिघे यांचे “१९४७ च्या इतिहासापासून आपण काय शिकलो” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे तसेच भारतीय सैन्य दलातील ५८ महाराष्ट्र बटालियनचे आर्मी ऑफिसर यांचा सन्मान सोहळा व मुलाखत आयोजित केली आहे. हा सन्मान सोहळा झाल्यानंतर ६. ३० वाजता मशाल फेरी आणि तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे.
मशाल फेरी व तिरंगा रॅलीचा मार्ग सिंधुदुर्ग महाविद्यालय, मामा वरेरकर नाट्यगृह, भरड नाका, बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ, टोपीवाला हायस्कूल, कन्याशाळा, सिंधुदुर्ग महाविद्यालय असा असणार आहे.
तरी या राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमास मालवण पंचक्रोशीतील सर्व नागरिक, विविध संस्था, शाळा, कॉलेज, विद्यार्थी, शिक्षक, सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने हातामध्ये तिरंगा घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन मालवण पालिका इंडियन स्वच्छता लीग कॅप्टन आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख, लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, सिंधुदुर्ग कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सीडीसी अध्यक्ष अँड. समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कूशे, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.