You are currently viewing कुडाळच्या चिमणी पाखर संस्था आयोजित स्पर्धेत निधी केळुसकर व अर्शीन शेख ठरल्या सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार…

कुडाळच्या चिमणी पाखर संस्था आयोजित स्पर्धेत निधी केळुसकर व अर्शीन शेख ठरल्या सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार…

कुडाळच्या चिमणी पाखर संस्था आयोजित स्पर्धेत निधी केळुसकर व अर्शीन शेख ठरल्या सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार…

कुडाळ

शोध नव्या नृत्य कलाकारांचा या कार्यक्रमा अंतर्गत चिमणी पाखरं आयोजित सिंधुदुर्ग डान्सिंग सुपर स्टार स्पर्धेत निधी केळुसकर व अर्शीन शेख या संयुक्तरित्या विजेत्या ठरल्या आहेत. या स्पर्धेत एकूण ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक अनंतराज पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनंतराज पाटकर, रोहन तांडेल, उमेश वेंगुर्लेकर, राहुल कदम, संजय कोरगावकर, प्रमोद नाईक, सौ. मुळ्ये, नागेश नेमळेकर, विजय सावंत, संजना परब, श्री .शेख, रवी कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली होती. यात लहान गटातून प्रथम स्फूर्ती खांबले, द्वितीय अदिती परब व ऋचा परब, तृतीय स्वराली हरम व मंत्रा कोळंबकर यांनी तर आराध्या मळेकर, लावण्या राऊळ, श्लोक जंगम आणि रिद्धी नार्वेकर याना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मध्यम गटातून प्रथम हेमांगी जाधव, द्वितीय सई राऊळ, सान्वी मोरजकर, तृतीय चैत्रा चव्हाण, रुता मार्गी यांनी तर उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन निधी नाईक, तन्वी परब, जान्हवी पावसकर यांना गौरविण्यात आले. मोठ्या गटातुन प्रथम प्राची पाटकर, द्वितीय युक्ती हळदणकर व पियुषा पेडणेकर, तृतीय निविदा चौगुले व प्राची जाधव यांनी पटकावला तर उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन लोकेश अणावकर, यशस्वी शेलटे, चिन्मयी सावंत या सर्वांना रोख रक्कम, आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून चिमणी पाखर संस्थेचे संचालक रवी कुडाळकर, दीक्षा नाईक, संजना पवार,अभिषेक चव्हाण, निखिल कुडाळकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदक निलेश गुरव, शुभम धुरी, नागेश नेमळेकर, राहुल कदम यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा