You are currently viewing चर्चेत असणारे आयएएस अधिकारी : श्री तुकाराम मुंढे

चर्चेत असणारे आयएएस अधिकारी : श्री तुकाराम मुंढे

(एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा महसूल पंधरवाडा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने काही आयएएस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांचा परिचय करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न)

 

मा. श्री तुकाराम मुंढेसाहेबांचा आम्ही ते आय ए एस ची परीक्षा पास झाले त्या वर्षी म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये भव्य सत्कार आयोजित केला होता आणि आज त्यांचे कार्य पाहून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो .मिशन आयएएसचे उद्घाटन सध्याचे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव माननीय श्री विकास खारगेसाहेब यांनी 12 मे 2000 ला केले . तेव्हा ते आमच्या भागात म्हणजे विदर्भात यवतमाळ येथे जिल्हाधिकारी होते.तेव्हापासून तर आजपर्यंत आम्ही दरवर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करीत आहोत . साधारणपणे आतापर्यंत 273 आयएएस आयपीएस आयएएस सनदी व राजपत्रित अधिकारी आमच्या या उपक्रमात सहभागी झाले आहेत. आज सर्वत्र चर्चेत असणारे व कमी कालावधीमध्ये जास्त बदल्या झालेले श्री तुकाराम मुंढेसाहेब जेव्हा आयएएस झाले तेव्हा मी सत्कारासाठी यांना फोन लावला . त्यांना संस्थेची सगळी माहिती सांगितली आणि अमरावतीला सत्काराला येण्याचे निमंत्रण दिले..श्री तुकाराम मुंढेसाहेब तेव्हा खूपच व्यस्त होते . ठीक ठिकाणी त्यांचे सत्कार होत होते.पण ते तळमळीने म्हणाले काठोळे आज शब्द देत नाही .पण तुम्ही अमरावतीला आयोजित केलेल्या सत्काराला येण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि एक दिवस मा.श्री तुकाराम मुंढेसाहेबांचा फोन आला .म्हणाले. मी तुमच्या अमरावतीच्या सत्काराच्या कार्यक्रमाला येतो . सत्कार कार्यक्रमाच्या दिवशी मुंढे साहेब औरंगाबादवरून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने आले . मी त्यांना माझी स्कूटर घेऊन घ्यायला गेलो .माझ्या स्कूटरवर डबल सीट बसून आम्ही घरी आलो . श्री तुकाराम मुंढे येणार हे बऱ्याच लोकांना त्यांच्या मित्रमंडळींना माहीत होतं .अमरावतीचे त्यांचे मित्र श्री संदीप राठोड श्रीमती कुसुम राठोड सध्या चर्चेत असलेले नागपूरचे आयपीएस अधिकारी जे सध्या उत्तराखंडमध्ये पोलीस महासंचालक आहेत ते श्री निलेश भरणेसाहेब ही सगळी मंडळी माझ्या घरी आली. सत्कारासाठी पुणे येथून श्री श्याम देशपांडे आयपीएस हर्षद वेंगुरलेकर आयआरएस आणि इतर मंडळी माझ्याकडे पोहोचली .तेव्हा साधन सामग्री फार नव्हती .माझ्याकडे कार पण नव्हती. सर्व व्यवहार मी आणि माझे कार्यकर्ते टू व्हीलर वर करीत होतो .श्री निलेश भरणेसाहेब आयपीएस यांनी नागपूर वरून मारुती व्हॅन आणल्यामुळे ती आमच्या सत्कारासाठी आलेल्या पाहुण्यांच्या उपयोगी पडली .सत्काराचा हा कार्यक्रम अमरावतीच्या महाराष्ट्रातील सर्व सभागृहात भव्य असलेल्या मोर्शी रोडवरील श्री संत ज्ञानेश्‍वर सास्कृतीक भवनामध्ये संपन्न झाला . सत्काराच्या या कार्यक्रमात सर्व मान्यवरांची भाषणे झाली. तसेच जे विद्यार्थी आयएएस झाले त्यांनी पण उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जेव्हा उपस्थित असलेल्या सर्वाना तुकाराम मुंढे साहेबांचे भाषण सर्वांना मनापासून आवडले .सर्व सत्कारमूर्ती श्री निलेश भरणे श्री श्याम देशपांडे श्री हर्षद वेंगुरलेकर यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली . स्पर्धा परीक्षेचा तो सुरुवातीचा काळ होता .व्यापक प्रमाणात जनजागृती झाली नव्हती. मिशन आय ए एस ने तो भार उचलला होता. आम्हाला आज अभिमान वाटतो की महाराष्ट्रात श्री तुकाराम मुंढेसाहेब जे काम करीत आहेत ते निश्चितच गौरवास्पद आहेत . त्यांच्या कार्याचा अभिमान आहे आणि या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचा आम्ही पंधरा वर्षापुर्वी मिशन आय ए एस तर्फे सत्कार केला यांच्या आम्हाला अभिमान आहे . मा.श्री तुकाराम मुंढे साहेब जिथे जिथे गेले तिथे त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीमुळे सर्वांना जिंकून कोरोनाच्या भयंकर काळात ते नागपूर महानगरपालिकेला मनपा आयुक्त म्हणून कार्यरत होते. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी करोनाग्रस्तांची अतिशय हृदयापासून मदत केली व अनेकांचे प्राण वाचवले. साहेब शिस्तप्रिय. नियमानुसार काम करणे त्यांना आवडते. त्यामुळे ते लोकाभिमुख आहेत.

मला आठवते कोरोना काळात त्यांची नागपूरवरून बदली झाली तेव्हा लोकांनी त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांच्यावर फुलांचा नागरिकांनी वर्षाव केला. जितने वाले कोई अलग काम नही करते वे हर काम अलग तरीकेसे करते है .या न्यायाने के काम करीत आहेत. ज्या विभागात ते जातात त्या विभागात आपली छाप पाडून जातात.यांना याप्रसंगी महसूल पंधरवडा निमित्त शुभेच्छा देतो..

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक

मिशन आय ए एस अमरावती कॅम्प

मो 9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा