*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आला श्रावण श्रावण*
मनी धुंद मोहरतो
घनघोर बरसतो
भिजवतो तनमन
आला श्रावण श्रावण….
चिंब चिंब भिजलेले
दाह आत उसळले
कधी भेटेल साजण
आला श्रावण श्रावण….
केवडाही मत्त झाला
मोगरा फुलून आला
काळ्या कुंतली माळणं
आला श्रावण श्रावण….
नदीला आला पूर
सख्या तूही दूरवर
पोळणारं रे चांदणं
आला श्रावण श्रावण…
वाट पाहुनी थकले
अश्रू नयनात आले
नको विरहाचे गाणं
आला श्रावण श्रावण…
गाते कोकिळा रानात
तुला सांगते कानात
भेट राधेला जाऊन
आला श्रावण श्रावण….
सृष्टी न्हाली रंगगंधात
आता तू मी अन् एकांत
द्वैत अद्वैताचं मीलन
आला श्रावण श्रावण….!!
°°°°°°°°°°°°°°💦°°°°°°°°°°°°°°
अरुणा दुद्दलवार @✍️