ओटवणेतील प्रज्वल पुनाजी पनासे इंडियन नेव्ही मध्ये दाखल
ओटवणे
काही महिन्यांपूर्वी भारतीय नौदलाच्या अग्निवीर एसएसआर पथकात भरती झालेला प्रज्वल पनासे हा युवक खडतर प्रशिक्षण पूर्ण करत अखेर इंडियन नेव्ही मध्ये दाखल झाला आहे. नुकताच त्याचा ओडिसा चिल्का येथे शपथ विधी पार पडला.ज्या ओटवणे गावात सैन्य दलात सेवा बजावणारे हाताच्याबोटावर मोजण्या येवढे बघायला मिळायचे.क्वचित एखाद्या वाडीतील एकाद दुसरा सैन्यात सेवा बजावणारा पाहायचा मिळायचा त्याच ओटवणेची ओळख भविष्यात सैनिकांचा गाव म्हणून निर्माण होईल आणि याची सुरुवात झाली असून याची प्रचिती गेल्या तीन चार वर्षात या गावातून सैन्यात भरती होणाऱ्या युवकांकडे बघून येते .
ओटवणेतील युवक सध्या सैन्यदलात भरती होण्यासाठी कठोर मेहनत घेत असून नुकतीच प्रज्वल पनासे या युवकाची इंडियन नेव्ही मध्ये वर्णी लागली आहे. खास म्हणजे प्रज्वल हा जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विध्यार्थी.सातवी पर्यंत जिल्हा परिषद ओटवणे शाळा नबर 2मधे सातवी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर दहावी पर्यंत शिक्षण ओटवणे हायस्कूल मध्ये पूर्ण करत 92 टक्के गुण मिळविले व एस. पी. के सावंतवाडी महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होत आपल्या ध्येय्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली.लहान पणापासून देशसेवेची आवड आणि वाडीतील युवकांची प्रेरणा या मुळे या स्वप्नांच्या दिशेने प्रज्वल याने वाटचाल सुरु केली. त्यासाठी सिग्मा अकॅडमी ची मीळालेली साथ, मार्गदर्शन आणि त्याने केलेले खडतर प्रयत्न यामुळे त्याची नौदलाच्या अग्निवीर एसएस आर मध्ये भरती झाली. 31 आठवड्याच खडतर प्रशिक्षण प्रज्वल पनासे याने चिल्का ओडिसा येथे पूर्ण केल आणि याच ठिकाणी त्याचा शपथ विधी कार्यक्रम पार पडला. या तीन ते चार वर्षात याच मांडवफातरवाडी येथील गणेश वर्णेकर, कृष्णा म्हापसेकर, गरुड कमांडो साबाजी पनासे, निशा रेडकर या युवकांनी सैन्यात दाखल होत गावातील युवकांसमोर आदर्श ठेवला आहे. यांसह प्रज्वल पनासे याची प्रेरणा असणारा त्याचा मोठा भाऊ प्रथमेश पनासे हा ही इंडियन नेवी मध्ये देश सेवा बजावत आहे.आणि यासर्व युवकांची प्रेरणा घेत आज अनेक युवक सैन्यात भरतीसाठी मेहनत करत आहेत.प्रज्वल ने आपल्या यशाच श्रेय वडील पुनाजी पनासे आणि आई रुक्मिणी पनासे यांना दिलं.याच बरोबर सिग्मा अकॅडमी आतापर्यंत ज्या ज्या गुरु जनांनी मार्गदर्शन केल,ज्या मित्र वर्गानि प्रोत्साहन दिलं यानाही आपल्या यशाच श्रेय दिलं. प्रज्वल पनासे यांनी मिळविलेले यश जरी आज दिसत असल तरी त्यामागे प्रचंड मोठी मेहनत, त्याग आणि कष्ट असून त्याच्यासारख्या युवकाची प्रेरणा घेत युवावर्गानी ध्येय्याच्या दिशेने वाटचाल केल्यास यश नक्की मिळवता येत आणि ही प्रेरणा घेत युवकांनी प्रयन्त करावे आणि सैन्यात दाखल होत देशसेवा करावी या लोकांकडून अपेक्षा वाढत आहेत .प्रज्वल याच्या यशाबद्दल त्याचे त्यांच्या आई वडिलांचे ग्रामस्थानमधून सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येत असून शुभेच्छा ही देण्यात येत आहेत.