You are currently viewing देवगड येथे १५ रोजी कॅरम स्पर्धा..

देवगड येथे १५ रोजी कॅरम स्पर्धा..

देवगड येथे १५ रोजी कॅरम स्पर्धा..

देवगड

देवगड हनुमान युवक क्रीडा मंडळातर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता येथील प्राथमिक शिक्षक भवन येथे कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा शालेय व खुल्या गटात होणार आहेत. स्पर्धेतील शालेय गटातील प्रथम क्रमांकाला ७०० रु. व चषक, द्वितीय क्रमांकाला ५०० रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी ३०० रु. तसेच खुल्या गटासाठी प्रथम क्रमांकास एक हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास ७०० रु. व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी ३०० रु. असे बक्षीस देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी येथील विनय प्रिंटर्स (मो.९८६०९२६५६७) व दोस्ताना सायकल स्टोअर्स येथे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा