*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*विरह लेखणीचा…*
थोडीच लेखणी ती
रूसून काय? बसली…
विरहात कर तिच्या हे
पुरते बधीर झाले …।
दूरीत लेखणीच्या
झालेय बावरे मन…
वेडावुनी जसे ते
पुरते अधीर झाले…।
सोसे न हा दुरावा
आर्जव करीत मन हे…
शोधात लेखणीच्या
फिरते फकीर झाले…।
पाहून लेखणी ती
कोठे कशी दिसेना…
वणवण करीत धावा
झुरते समीर झाले…।
झालीय लेखणी ती
जिव-प्राण या तनाची…
श्वासाविनाच भासे
चलते शरीर झाले…।
✍️शशांक दिनकरराव देशमुख©®
चांदुरबाजार, जि. अमरावती
(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४
मो. क्र. ९९२३५३६३२५