*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*
*कशी लागनी ती झडी….*
कशी लाई झडी देखा पानी गुरूगुरू पडे
जसं शानं ते लेकरू बिलकूल नही रडे
नही दडदड खडखड देखा नही गाजावाजा
फुले परमयतसं जागे जागे ताजा ताजा…
गारा चिखोल हुईग्या पाय फसे वावरमां
पिके हासतसं देखा कितला सेतस सुखमा
टराटरा व्हये वाढ दिसे मासे फुलतसं
सरवनना महिना उपकार जानतसं..
फुलोराम्हा त्या बाजऱ्या जवार पोघाम्हा डोलसं
हिरवा शालू नेसीसन बांधवर मुरकसं
कशी दिसस देखनी नऊवारीम्हा ती नार
हालीडुली खुनावस राघू टोचती जवार…
आसी झेपावे चादर आंगभर जवारीले
टुचूटुचू झोंबतसं फुलवर बाजरीले
तृप्त हुयीन पयेत झोका खाती निमवर
सरावनना महिना बांध बांध उपवर…
सरावन तो देखना वसुंधराना डागिना
पाचू पंघरसं रोज कशी दिससं नगिना
सनासुदीना महिना झोका आमराई खाये
लेक नांदस सासरे याद माहेरनी येये…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)