You are currently viewing विरोधक विकास कामांच्या आड येण्याचे काम करतायत…

विरोधक विकास कामांच्या आड येण्याचे काम करतायत…

विरोधक विकास कामांच्या आड येण्याचे काम करतायत…

विकास कामाची काळजी विरोधकांनी करू नये:आमदार नितेश राणे राणेंचा लोकार्पण सोहळ्यात विरोधकांना टोला..

कणकवली :

आपल्या सगळ्यांना आठवत असेल की गेल्या वर्षीच्या आठ ऑगस्टला आपण सगळेजण असेच इथे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालो होतो. ऑनलाईनवर तो कार्यक्रम होता. याच प्रकल्पाचे भूमिपूजन आपण केले. तर ३६५ दिवसांनंतर या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण इथे उपस्थित आहोत. यासाठी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे शिल्पकार पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि सार्वजनिक बांधकामचे अजयकुमार सर्वगोड असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मनापासून अभिनंदन करतो. कोकणात महायुती आणि नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे. विकासकामांच्या आड काळ्या मांजरासारखे येण्याचे काम विरोधक करताहेत, अशी टीका आ. नितेश राणे यांनी केली.

कणकवली रेल्वे स्टेशन सुशोभिकरण कामाचे लोकार्पण खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार नितेश राणे जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोकण रेल्वेचे सहसंचालक आर. के. हेगडे सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, माजी आमदार राजन तेली, अॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, बंडू हर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. नितेश राणे म्हणाले, रविंद्र चव्हाण यांचे मनापासून अभिनंदन करतो. २०१४ पर्यंत नारायण राणे जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हा विकासकामांचा धडाका पाहिला होता. त्याच्यानंतर थोडा गॅप पडला आणि आता रविंद्र चव्हाण हे पालकमंत्री झाल्यानंतर तो अनुभव आम्हाला परत येतोय. काम कसे करून घ्यायचे आणि नियोजित पद्धतीने काम कसे करायचे याबद्दलचा एक चांगला पॅटर्न आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकाकडे गेल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आणि वेगळ्या पद्धतीची चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहे. सातत्याने प्रवाशांच्या तक्रारी असायच्या, साहित्याचे प्रश्न असायचे, पण आता या रेल्वे स्थानकामध्ये उभे राहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो. आपण आपल्या जिल्ह्यातील एका रेल्वेस्थानका मध्ये उभे आहोत. विमानतळासारखा आपल्याला अनुभव येतो.

रेल्वे स्थानकाबाबतचे इतर प्रश्नही लवकरच सोडविले जातील. काळजी करू नका. महत्वाचे प्रश्न असतील तेही सोडवले जातील, एवढा विश्वास आणि शब्द तुम्हाला मी आज यानिमित्ताने देतो. विरोधकानी बॅनर लावला होता. पण आपण चांगले काही करू शकत नाही, तर मग दुसरे कोणीतरी चांगले करतय ते पण पाहवत नाही. त्यामुळे विकासकामांच्या आड काळ्या मांजरासारखे येण्याचे काम विरोधक करीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पालघर पासून कोकणात महायुती आणि नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे. त्याचे प्रतिबिंब आपल्याला मतदान पेटीमध्ये दिसले. त्यामुळे आता कोकणाची काळजी करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांवर दिलेली आहे. त्यामुळे आमच्या विरोधकांनी त्याबद्दलची विनाकारण चर्चा व चिंता करू नये, असा टोला नितेश राणे यांनी विरोधकांना लगावला आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा