You are currently viewing क्रांती दिना निमित भाजपा वेंगुर्ले कार्यालया समोर ध्वजारोहण व हुतात्मा स्मारकास पुष्पगुच्छ वाहुन श्रद्धांजली

क्रांती दिना निमित भाजपा वेंगुर्ले कार्यालया समोर ध्वजारोहण व हुतात्मा स्मारकास पुष्पगुच्छ वाहुन श्रद्धांजली

*क्रांती दिना निमित भाजपा वेंगुर्ले कार्यालया समोर ध्वजारोहण व हुतात्मा स्मारकास पुष्पगुच्छ वाहुन श्रद्धांजली* .

*वेंगुर्ले तालुका निरीक्षक तथा मा.नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजु परब यांच्या हस्ते ध्वजारोहण*

वेंगुर्ले

भाजपा च्या वतीने ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ” हर घर तिरंगा ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमा अंतर्गत क्रांती दिनाचा निमीत्ताने भाजपा तालुका कार्यालयाच्या समोर ध्वजारोहण करण्यात आले .
यावेळी मार्गदर्शन करताना संजु परब म्हणाले कि ९ ऑगस्ट १९४२ रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला . हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी ‘९ ऑगस्ट’ हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळे याला ‘ऑगस्ट चळवळ’ किंवा ‘ऑगस्ट क्रांती’ असेही म्हणतात. भारतातील ब्रिटीशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली होती.
स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी देशाला आवाहन करण्यासाठी महात्मा गांधी या ऐतिहासिक क्षणांची आठवण करुन देणाऱ्या स्मारकाची उभारणी या मैदानावर केली गेली आहे. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात गोवालीया टॅक येथून झाल्याने या मैदानाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.
ध्वजारोहण झाल्यानंतर हुतात्मा स्मारकास पुष्पगुच्छ वाहुन क्रांतीकारकांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा ” हर घर तिरंगा ” अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, सुरेंद्र चव्हाण , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , दिपक भगत , किर्तीमंगल भगत , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री व रमेश नार्वेकर , शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे व जगन्नाथ राणे , कार्यालय प्रमुख छोटु कुबल इत्यादी उपस्थित होते .

_____________________________
*संवाद मीडिया*

🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕

माई ह्युंदाई सिंधुदुर्गात सुरु झालाय
*श्रावण महोत्सव*

*श्रावण स्पेशल ऑफर्स*

_ह्युंदाईच्या विशाल श्रेणीतील सीएनजी ऑरा, एक्सटर आणि निओस वर मिळेल_

*इन्शुरन्स एकदम फ्री*

*आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आजच कॉल करा* 📲

माई ह्युंदाई कुडाळ
उद्यमनगर
*संपर्क:* 7410006037

माई ह्युंदाई कणकवली
वृक्षवल्ली नर्सरी वागदे

*संपर्क:* 8956130166

_माई ह्युंदाई कुडाळ आणि कणकवली येथे आता सुसज्ज आणि अद्ययावत *वर्कशॉप*_

_आता मुंबई, गोवा,कोल्हापूरला जायची गरज नाही, कुडाळ माई ह्युंडामध्ये आपल्या सेवेसाठी अत्याधुनिक *बॉडी शॉप* सेवा सुरु आहे !_🚕🚗

*माई ह्युंदाई अविरत सेवेची पंचवीस वर्ष ….*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा