You are currently viewing प्रभू दर्शन

प्रभू दर्शन

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*प्रभू दर्शन*

 

सणासुदीला दारादारात शुभ अशी सुंदर तोरणे बांधण्यासाठी च जणू भगवा गच्च झेंडू बहरून येतो व दारांची शोभा वाढवतो ।

रंगीत कर्दळी, अबोली,सदाफुली अंगणाची शोभा वाढवतात । हिरव्या गवतात लाल पिवळ्या निळ्या गवत फूलांची रांगोळी बघतच राहावी इतकी सुंदर असते. निसर्गाचेच कौशल्य ते.

कैक रंगाच्या घाटदार जास्वंदी, सुगंधी शुभ्र अनंतपुष्पे ,तगरी चाफे फुलांच्या परडीत पूजेसाठी सज्ज होतात .

लाल चुटूक जास्वंदी श्री च्या मुगटात विराजमान होते. संध्याकाळी अनेकरंगी नाजूक मोहक गुलबक्षी बाग लक्षवेधी बनवते ।

हळूच खुडलेल्या तुळसमंजिर्या खास क्रिष्णासाठी ,विष्णू देवासाठीच असतात .हिरव्यागार दुर्वांचे जावळ अंगणात वाढत जाते व दुर्वांकुर गणेशाच्या मस्तकी चपखलपणे बसते ।

अंगणात तान्ह्या लिलिकळ्या सकाळी ऊमलतात व किरणांबरोबर खेळत दमुन जातात व कधी कोमेजतात कळतपण नाही

पहाटे पहाटे अंगणात पारीजात धवल केशरी फुलांचा गालिचाच पसरतो व त्या वर चंदेरी दंवबिंदू खेळ मांडतात

पांढरे लालंलाल चाफे स्वागतासाठी सतत खडे राहातात

अजूनही शेवंती अबोली च्या कळ्या झोपेत आहेत .त्या देवांसाठी हाल वेण्या मधे ठाण मांडतात । त्या आता नवरात्रात फुलतील व देवी सरस्वतीला सजवतील.

हा बघा राजस पिवळा धम्मक रूपवान सुगंधाचा खजिनाच घेऊन पानाआड मोठ्या रूबाबात फूलून आलाय .जणू अंगणीचा पूष्पराजच.

तेव्हढ्यात गंमत झाली. आकाशी खेळणार्या तारका बागेच्या रूपरंग,सुगंधावर भाळल्या व हरखून अलगद बागेत ऊतरल्या. बेभान होत आकाश विसरल्या. पानोपानी बसत फूलं कळ्यांबरोबर. खेळत राहिल्या सखा चंद्र रागावला व त्याने त्यांची तारका फूले बनवली. मंद सुगंधी पांढर्या फूलांची ती रातराणी होऊन रात्री सुगंधी करू लागली .जगाला प्रितीच्या स्वप्नात नेऊ लागली .

किती कौशल्याने हा निसर्ग फुला पानांना रंग सुगंधाने सजवत राहातो. ऋतुमागुनी ऋतु बहरून आणतो. स्रुष्टी ला खुष करत राहातो . अविरत त्याचे हे कार्य चालू आहे .

पहाटेच्या प्रहरी या फूलातून रंग सुगंधाचा घमघमाट यातुन स्वतः चे प्रसन्न दर्शन देत राहातात.

मी स्वतः ला विसरत ते दर्शन घेऊन प्रभू चरणी नतमस्तक झाले .

भानावर आले तेव्हा कळेना कि हे घर ही बहरलेली बाग ही फूले खरीच आहेत ना?कि हे स्वप्नच बघत होते .

पण अजाणतेपणी समजलेले ते प्रभू चे दर्शन मात्र नक्कीच खरेखुरे होते.

 

अनुराधा जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा