महाराष्ट्र एटीएसने मोठ्या ड्रग्स रॅकेटवर दणक्यात कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी एटीएस ने हिमाचल प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले असून अजूनही अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या छाप्यात आतापर्यंत दोन जणांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या पूर्व माहितीनुसार गेल्या महिन्यात पुण्यात ड्रग्स नेटवर्कच्या सहाय्याने दोन आरोपींना अटक केल्यानंतर हिमाचल प्रदेशातील ड्रग्स अँगल उघडकीस आला होता. यावेळी पुणे पोलिसांनी हा तपास महाराष्ट्र एटीएस कधी सोपवला होता. एटीएस गेल्या काही दिवसापासून या प्रकरणाची हिमाचल प्रदेशात ड्रग्स अँगल ने चौकशी करत आहेत.
पुणे रेल्वे पोलिसांनी डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेशमधील ललित कुमार शर्मा (49), कौलसिंग उर्फ भारद्वाज (40) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 34 किलो 404 ग्रॅम चरस जप्त केले होते. यावेळी नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांना गोवा मुंबई आणि अन्य शहरांमध्ये चरस पोचवायचे असल्याचे चौकशीदरम्यान उघडकीस आले आहे.