You are currently viewing ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष; अनधिकृत बांधकामांविरुद्ध उपोषणाचे आवाहन – चंद्रशेखर दशरथ रावराणे

ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष; अनधिकृत बांधकामांविरुद्ध उपोषणाचे आवाहन – चंद्रशेखर दशरथ रावराणे

*ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष; अनधिकृत बांधकामांविरुद्ध उपोषणाचे आवाहन – चंद्रशेखर दशरथ रावराणे

कणकवली

चंद्रशेखर दशरथ रावराणे राहणार लोरे नं.1 ता. कणकवली ,जि.सिंधुदुर्ग, ग्रामस्थ आणि लोरे गावचे नागरिक, यांनी पत्राद्वारे कळविले की  की गांगेश्वर-लोरे ते सोनारवाडी या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्यावर अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांच्या समस्येमुळे आम्ही अतिशय त्रस्त आहोत.

ग्रामपंचायतच्या वतीने कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. विशेषत: सरपंचांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे, ज्यामुळे अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. ग्रामस्थांच्या वारंवार अर्ज आणि तक्रारींना योग्य प्रतिसाद मिळालेला नाही.

आम्ही या समस्येबाबत जिल्हाधिकारी महोदय सिंधुदुर्ग नगरी ओरस सिंधुदुर्ग यांना आधीही कळविले आहे. यापूर्वी 26 जानेवारी 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी उपोषण केले होते, परंतु अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे, या गंभीर समस्येकडे आपले लक्ष वेधण्यासाठी आणि त्वरित कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्ही पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यदिनी, आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग नगरी, ओरस येथे उपोषणाला बसणार आहोत. आम्ही आपल्या माध्यमांतून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अपेक्षा करतो की, त्वरित उपाययोजना करण्यात येतील.

चंद्रशेखर दशरथ रावराणे

_____________________________
*संवाद मीडिया*

🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕

माई ह्युंदाई सिंधुदुर्गात सुरु झालाय
*श्रावण महोत्सव*

*श्रावण स्पेशल ऑफर्स*

_ह्युंदाईच्या विशाल श्रेणीतील सीएनजी ऑरा, एक्सटर आणि निओस वर मिळेल_

*इन्शुरन्स एकदम फ्री*

*आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आजच कॉल करा* 📲

माई ह्युंदाई कुडाळ
उद्यमनगर
*संपर्क:* 7410006037

माई ह्युंदाई कणकवली
वृक्षवल्ली नर्सरी वागदे

*संपर्क:* 8956130166

_माई ह्युंदाई कुडाळ आणि कणकवली येथे आता सुसज्ज आणि अद्ययावत *वर्कशॉप*_

_आता मुंबई, गोवा,कोल्हापूरला जायची गरज नाही, कुडाळ माई ह्युंडामध्ये आपल्या सेवेसाठी अत्याधुनिक *बॉडी शॉप* सेवा सुरु आहे !_🚕🚗

*माई ह्युंदाई अविरत सेवेची पंचवीस वर्ष ….*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा