सावंतवाडी :
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजता हा लोकार्पण सोहळा होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यात शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि खासदार नारायण राणे, आ. निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. नितेश राणे, आ. वैभव नाईक तसेच विशेष उपस्थिती सा. बां. विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीम. मनीषा पाटणकर म्हैसकर, सा. बां. विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सा. बां. विभागाचे सचिव (बांधकाम) संजय दशपुते, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा, सा. बां. विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, जिल्हाधिकारी किशोर तावडे, आदी मान्यवर उपस्थित होणार आहे.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उपविभाग अभियंता वैभव सगरे, सहाय्यक अभियंता प्रमोद लोहार यांनी केले आहे.