सिंधुदुर्ग:
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कणकवली व सिंधुदुर्गनगरी या रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण व सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. सकाळी १०.३० वाजता कणकवली तर दुपारी १२.०० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील कामाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यास आ. निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. नितेश राणे, आ. वैभव नाईक तसेच जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपविभाग अधीक्षक विनायक जोशी, कनिष्ठ अभियंता शुभम दुड्ये यांनी केले आहे.