You are currently viewing आई व्हायची तिजला घाई

आई व्हायची तिजला घाई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आई व्हायची तिजला घाई*

 

शांती सुमी आमच्या लेकी

गोष्ट तशी जुनी फक्कडशी

पिकून केस झाल्या आजी

खेळ घेऊन झोपती उशाशी

 

गृहिणी पक्या शंभर टक्के

लहर येते अजून कधीमधी

मांडून बसती पसारा सारा

जडली खेळाची पुरी व्याधी

 

खेळ साधा पितळी भांड्याचा

पितांबरी लावून स्वच्छ करती

लक्ष ठेवून रिंगमास्टर सारखे

वाघ सिंह होऊन गुरगुरती

 

भांडी सुध्दा लबाड होऊन

उठून बसती मध्य रात्रीला

खडखड करून रडत बस्ती

कोण आवरणार भोंग्याला

 

पातेले भांडते *चमच्यासंगे*

कालथा पळीचे फिरतो मागे

मनुष्य भावना त्यांना ग्रासती

चिमटा घेऊन *चिमटा* सांगे

 

फुंकणी फुंकते कान कपाचे

बशी बाईच्या काढून खोड्या

चूल भडकते ऐकून चुगल्या

कप करतो उगा *चहाड्या*

 

शांती सुमी भोळ्या भाबड्या

बसायच्या बघत वेड्यासारखे

पोळपाट लाटणे उगा भिडाचे

रवीला होते *चित्र* अनोखे

 

ऐकून गोंगाट या खेळण्यांचा

जागे व्हायचे आमचे *बाबा*

शांत बसायची निमूट खेळणी

शांती घ्यायची सर्वांचा ताबा

 

आई व्हायची तिजला घाई

सुमीला दुसरा पर्याय नव्हता

बनुनी मावशी आता सर्वांची

कोंबडा सर्वांना साक्षी होता

 

विनायक जोशी ✒️ठाणे

मीलनध्वनी/९३२४३२४१५७

प्रतिक्रिया व्यक्त करा