You are currently viewing व्यथा

व्यथा

*शाळेतील साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*व्यथा*

 

एकाएकी वाटले

जग स्वत:त रमले

वेळ येता कळते

कुणीच नाही आपले…

 

आपण मात्र बदलतो

कधी वाट कुणासाठी

दाखवतात कृतज्ञता

पण ते असते गरजेसाठी…

 

नुसतीच नको सोबत

भावनांची हवी भागीदारी

कुणाला काय आपल्या मनाचे

दिसते फक्त दुनियादारी..

 

हवा असतो एक दिलासा

कुणी नसले तरी आहे मी

जेव्हां होतो भंग अपेक्षांचा

आपल्यासाठी सारेच कुचकामी…..

 

मीही आता ठरवते

जगावे आपल्याच साठी

क्षण दु:खाचे आनंदाचे

बांधाव्या आपल्या आपणच गाठी…

 

फारसे कुणात गुंतु नये

कुणासाठी कशास झोकायचे

हाक मारता आपण कोणास

माहीत आहे कोणीच नाही यायचे…..

 

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा