You are currently viewing आजचे चिंतन

आजचे चिंतन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय अध्यक्ष ज्येष्ठ लेखक कवी पांडुरंगजी कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*आजचे चिंतन*

 

*( गोष्ट छोटी पण प्रचिती मोठी )*

 

*सज्जन कोणास म्हणावे?*

 

सुरेश नेहमीप्रमाणे रोजच्या फुलाlवाल्याकडून देवासाठी हारफुले घ्यायचा. एक दिवस घाईत असल्यामुळे तो सुटे पैसे न्यायाचे विसरला. सुटे पैसे नसल्यामुळे दुकानदार म्हणाला उद्या द्या. घाईत त्याने कधी नव्हे ते ते फूल हराचे पाकीट पुढच्या डिक्कीत ठेवले. दुसरे दिवशी नेहमीप्रमाणे त्याने रोजचे 15 रुपयेच दिले. दुकानदारानेही कालचे मागितले नाहीत. कदाचित तोही विसरला असावा. यानेही आठवणीत असून मुद्दाम टाळले व 15 रुपये वाचले म्हणून मनातून आनंदी झाला. चार दिवसांनी स्कूटर च्या पुढच्या डिक्कीतून कसला तरी कुबट वास आला. पहावे तर म्हणून त्याने डिक्की उघडली तर ती त्या दिवशीची फुले व हार होते.

त्या दिवशी अर्जेन्ट कामानिमित्त पूजा न करताच घाईघाईने तो त्याच्या कामाला निघून गेला होता की जे ते त्याचे कामाही झाले नव्हते व पुजाही राहिली होती व घाईमुळे हार डिक्कीतून काढायचे ही राहून गेले होते.

तो मनातून खूप खजिल झाला. 15 रुपये वाचविले खरे पण त्याचा मोबदला त्याला मोठ्या प्रमाणात द्यावा लागला होता.

मित्रानो याचे डायरेक्ट असे गणित मांडता येत नाही पण अनुभूती मात्र नक्की येते. फरक एव्हढाच की ती काहींना कळते काहींना कळत नाही.

कुणीतरी परमेश्वर नावाची अदृश्य शक्ती हे सर्व पहात असते आणि त्यांनीच घालून दिलेल्या कर्मसिद्धांत्ता प्रमाणे त्याचे चांगले वा वाईट जे असेल जसे असेल तसे फळ आपणास मिळत असते. त्याचे कर्तेपण मात्र परमेश्वर कधीच स्वतः कडे घेत नाही.

हे ज्याला कळते तो त्याप्रमाणे वागतो.

त्यालाच खऱ्या अर्थाने सज्जन म्हणावे.

 

*राम कृष्ण हरी*

*🚩पांडुरंग 🌹कुलकर्णी 🚩*

प्रतिक्रिया व्यक्त करा