You are currently viewing सिंधुदुर्ग-पुणे विमान सेवा 24 ऑगस्टपासून सुरू…

सिंधुदुर्ग-पुणे विमान सेवा 24 ऑगस्टपासून सुरू…

वेंगुर्ला / परुळे :

 

सिंधुदुर्ग-पुणे या मार्गासाठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली असून 24 ऑगस्टपासून सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थीपूर्वी ही विमानसेवा Fly 91 कंपनीतर्फे सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शनिवार- रविवारी सिंधुदुर्ग-पुणे-सिंधुदुर्ग अशी प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

पुणे विमानतळ येथे स्लॉट उपलब्ध करून मिळण्यात अडचण येत होती. याबाबत खासदार नारायण राणे यांनी हवाईमंत्री आणि संरक्षणमंत्री यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. त्यानंतर दोन दिवसांसाठी विमानसेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत माजी सभापती नीलेश सामंत यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. सदर विमान सेवा संपूर्ण आठवडाभर कायमस्वरूपी सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन राणे यांनी त्यांना दिले. यावेळी आमदार नीतेश राणे व भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा