जिल्हास्तरीय शालेय व नेहरू कप हॉकी स्पर्धेत सैनिक स्कूल आंबोली, अजिंक्य….
आंबोली
दि.७ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली येथे जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय हॉकी स्पर्धा व नेहरू कप हॉकी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघाने सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. रणदिवे सर,प्रशालेचे प्राचार्य श्री.एन.डी. गावडे, ज्येष्ठ शिक्षक आर. आर. गावडे, श्री.ए.एस. गावडे उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमात श्री. आर. आर.गावडे व सहा. क्रीडा अधिकारी श्री. रणदिवे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
14 वर्षे गटात सैनिक स्कूल, आंबोलीने स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव संघाचा 6-0 असा एकतर्फी विजय मिळवला. तसेच 15 वर्षे गटात सैनिक स्कूलने स्टेपिंग स्टोन कोलगावला 1-0 ने पराभूत केले.
17 आणि 19 गटांमध्ये ही सैनिक स्कूल आंबोली या संघाला विजयी घोषित करून विभाग स्तरासाठी निवड करण्यात आली. हॉकी स्पर्धेत 14, 15, 17 आणि 19 गटात सैनिक स्कूलने दणदणीत विजय संपादन करून विभाग स्तरासाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेत आदर्श अष्टेकर, अरिंदम पवार आणि रुद्र शेट्टी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
सर्व विजयी संघातील खेळाडूंचे आणि त्यांचे प्रशिक्षक श्री. एम.एम.देसाई यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, संचालक श्री. जाॅय डॉन्टस, कार्यालयीन सचिव श्री.दिपक राऊळ व सर्व संचालक मंडळ आणि प्राचार्य श्री.एन.डी. यांनी गावडे यांनी केले. तसेच सर्व खेळाडूंना विभाग स्तरीय निवडी बाबत शुभेच्छा दिल्या.
_____________________________
*संवाद मीडिया*
🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕
माई ह्युंदाई सिंधुदुर्गात सुरु झालाय
*श्रावण महोत्सव*
*श्रावण स्पेशल ऑफर्स*
_ह्युंदाईच्या विशाल श्रेणीतील सीएनजी ऑरा, एक्सटर आणि निओस वर मिळेल_
*इन्शुरन्स एकदम फ्री*
*आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आजच कॉल करा* 📲
माई ह्युंदाई कुडाळ
उद्यमनगर
*संपर्क:* 7410006037
माई ह्युंदाई कणकवली
वृक्षवल्ली नर्सरी वागदे
*संपर्क:* 8956130166
_माई ह्युंदाई कुडाळ आणि कणकवली येथे आता सुसज्ज आणि अद्ययावत *वर्कशॉप*_
_आता मुंबई, गोवा,कोल्हापूरला जायची गरज नाही, कुडाळ माई ह्युंडामध्ये आपल्या सेवेसाठी अत्याधुनिक *बॉडी शॉप* सेवा सुरु आहे !_🚕🚗
*माई ह्युंदाई अविरत सेवेची पंचवीस वर्ष ….*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*