दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्यातील मांगेली – तळेवाडी गावचे सुपुत्र वेदमूर्ती हरिश्चंद्र मालू गवस, यांनी दिनांक ७ एप्रिल २०२४ साली संपन्न झालेल्या ३९ व्या महाराष्ट्र सेट परीक्षेत, संस्कृत विषयात (१८० गुण मिळवीत ६०% घेऊन उत्तीर्ण होत प्रावीण्य मिळविले. सद्या गवस हे कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय- रामटेक नागपूर येथे व्याकरणविभागात व्याकरण विभागाध्यक्ष आचार्य हरेकृष्ण अगस्ती सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत व्याकरण विषयात पीएच.डी करीत आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे विविध विषयात त्यांनी सुवर्ण पदके प्राप्त केली आहे. आई, वडील गुरुजनांच्या मार्गदर्शनाने शैक्षणिक क्षेत्रात ते भरारी घेत आहे. गवस यांची आता वेदमूर्ती म्हणून ओळख होत आहे.