कणकवली :
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या कणकवली येथील रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रेल्वेस्टेशन प्रवेशद्वाराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. गेले काही महिने सुरू असलेल्या या कामाच्या शुभारंभावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत कणकवली मतदारसंघातील पात्र लाभार्थ्यांना नियुक्तीपत्राचे वाटपही करण्यात येणार आहे.