*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रावणस्पर्श !! अष्टांगात !!*
आसमंताच्या ओठावरचे शब्द
रूणूझूणू करत खेळाया आले
काळजांत श्रावण धुन वाजवत
शब्दांचे थेंब ओलसर झाले..!
आकाश भरून आलं
ढगांचा ऊर दाटून गेला
झाडं फांद्या अबोल झाली
आवाज देत श्रावण आला ..!
श्रावणस्पर्श अष्टांगात
ओळही दाटून येते
प्रतिमेला गवसत तिही
पुढ्यात उभी ठाकते ..!
काळजांत भिडला श्रावणस्पर्श
धर्मकांडाला जावून भिडतो
धुक्यावर चर्रे ओढत
प्राणसख्यांना आवाज देतो ..!
ओलीचिंब गात्रे लावण्यवती
चारूलतेस गुणगुणायला लावती
आठवणींच्या हळुवार पावलांनी
श्रावणस्पर्शाच्या खुणा उमटती ..!
….
बाबा ठाकूर धन्यवाद