*बांबूळी येथे उपचाराला जाण्यासाठी २ पेशंट असतील तरच १०८ रुग्णवाहिका देण्याचा जिल्हा रुग्णालयातील गंभीर प्रकार*
*आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत अधिकारी आणि कोऑर्डीनेटरला खडसावले*
*पेशंटांना १०८ सुविधा मिळत नसेल तर ती बंद करा आम्ही पेशंटांसाठी रुग्णवाहिका देतो – आ.वैभव नाईक*
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय येथून गोवा बांबूळी येथे उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने पेशंट न्यावयाचा असल्यास किमान २ पेशंट असतील तरच १०८ रुग्णवाहिका दिली जात आहे. दुसरा पेशंट मिळेपर्यंत पहिल्या पेशंटला आवश्यक उपचारापासून वंचित रहावे लागते हि बाब गंभीर असून आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत आज ओरोस येथे १०८ रुग्णवाहिकेचे कोऑर्डीनेटर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांना धारेवर धरले. असा कोणता नियम आहे का? याबाबत कडक शब्दात जाब विचारला. गोवा बांबूळी येथे न्यावा लागणारा एक जरी पेशंट असेल तरी त्याला १०८ रुग्णवाहिका दिलीच पाहिजे. तुमचा मनमानी कारभार येथे चालणार नाही. नाहीतर तुमची १०८ सुविधा बंद करा आम्ही पेशंट साठी रुग्णवाहिका देतो. असे आमदार वैभव नाईक यांनी ठणकावून सांगितले.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांची सोमवारी तातडीची बैठक आयोजित करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर दिल्या. जर पुन्हा अशी तक्रार आल्यास पुन्हा आम्ही येथे येऊ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिला. तर पालकमंत्री काय करत आहेत त्यांनी रुग्णालयाचा आढावा घ्यायला नको का? असा संतप्त सवाल कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केला.
https://www.facebook.com/share/v/b5zPFJUaooNvotHo/?mibextid=oFDknk