*स्वातंत्रदिनी स्मशानभूमीत उपोषणास बसणार*
*सावंतवाडी शहारातील वकिलाचा इशारा*
सावंतवाडी
स्मशानभुमी संदर्भात रॅक व फाऊंडेशन दुरुस्ती न झाल्यास स्वातंत्रदिनी सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या विरोधात उपोषणाचा इशारा ॲड.सुरेंद्र बांदेकर यांनी दिला आहे.
स्मशानभुमी संदर्भात रॅक व फाऊंडेशन दुरुस्ती बाबत ऑगस्ट २०२३ ते ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत तोंडी व लेखी निवेदने देऊनही , सावंतवाडी मुख्याधिकारी यांनी आजतागायत सावंतवाडी उपरल स्मशानभुमी दुरुस्तीचे कोणतेही तोंडी अथवा लेखी सुरेंद्र बांदेकर यांना कळविलेले नाही. १४ ऑगस्ट पर्यंत दुरुस्ती न केल्यास नाईलाजास्तव १५ ऑगस्टला १०.०० वाजता मुख्याधिकारी सावंतवाडी यांच्या विरोधात सुरेंद्र बांदेकर (सभापती -पाणी पुरवठा व उद्यान समिती नगरसेवक – सावंतवाडी नगरपरिषद) हे स्मशानभुमीत उपोषणास बसणार असल्याचे निवेदन त्यांनी दिले आहे.