*शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोरील आंदोलन*
*आंदोलनकर्त्यांची सशर्थ जामिनावर मुक्तता*
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगार यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा युवासेनेच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात त्यांच्या सावंतवाडी येथील घरासमोर आंदोलन केले होते . त्या प्रकरणी मंदार श्रीकृष्ण शिरसाठ, योगेश धुरी, अमित राणे, संदीप महाडेश्वर, धीरेंद्र चव्हाण, अमित भोगले, सागर नाणोसकर, राजेश शेटकर, गुणाजी गावडे, विष्णू उर्फ आबा सावंत, योगेश नाईक, काजल सावंत, निनाक्षी मेथर, तेजस्वी परब, सोनाली सावंत, पायल आढाव यांना आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांची प्रत्येकी ५०००/- च्या सशर्त जामिनावर मुक्तता करण्यात आली. या कामी ॲड. नीलिमा सावंत/गावडे, ॲड.सायली सावंत, ॲड. कौस्तुभ गावडे यांनी काम पाहिले.