दागिने लंपास करणाऱ्या महिलेला पोलिस कोठडी
कणकवली
फोंडाघाट बाजारपेठेतील गौरी ज्वेलर्स या दुकानातील दागिन लंपास करणाऱ्या अर्पिता विठ्ठल रावल (२४, मूळ रा. हरकुळ खुर्द, रावलेवाडी सध्या रा. सिद्धार्थ सृष्टी, सागावा डोंबिवली पूर्व) हिला ९ ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठड सुनावण्यात आल्याचे कणकवली पोलिसांनी सांगितले.
३० जुलै रोजी संशयित आरोप अर्पिता रावले हिने दागिने खरेद करण्याच्या बहाण्याने गौर ज्वेलर्समध्ये जात ९३ हजारांचे दागिने हातचलाखीने लंपास केले होते याबाबत सुमित मालडीकर यांच्या तक्रारीनुसार कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अर्पिता हिला डोंबिवलीमधून ताब्यात घेत कणकवली पोलिसांकडे ४ ऑगस्ट रोजी सुपूर्द केले होते.
दरम्यान, अर्पिता हिला अटक करून कणकवली न्यायालयात हजर केले असता तिला ९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार उत्तम वंजारे करत आहेत.