You are currently viewing नगरपंचायत, नगरपरिषद कर्मचारी आजपासून संपावर…

नगरपंचायत, नगरपरिषद कर्मचारी आजपासून संपावर…

नगरपंचायत, नगरपरिषद कर्मचारी आजपासून संपावर…

कणकवली

राज्यातील सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधील कामगार आज पासून संपावर गेले आहेत. यात कणकवली नगरपंचायतीसह जिल्ह्यातील इतर नगरपंचायत आणि नगरपरिषद मधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषदा यामधील कर्मचारी, संवर्ग कर्मचारी यांना मुख्यमंत्री यांनी सर्व लाभ देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. पण राज्यातील काही अधिकारी मनमानी करीत आहेत. या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आजपासून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद आंदोलन पुकारले आहे.
दरम्यान राज्यातील नगरपरिषद कर्मचारी ७ ऑगस्ट आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय बेलापूर (नवी मुंबई) ते मंत्रालय (मुंबई) मार्गावर लाँगमार्च काढणार आहेत. यात राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील कामगार, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी व ज्या संघटना कामगारांच्या हिताचा विचार करीत आहेत, त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यामधील सर्व नगर परिषद कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व लाभ देण्याबाबत मंजुरी दिली असताना, काही अधिकारी मनमानी करीत असल्याने त्यांना जाब विचारण्यासाठी हे आंदोलन आहे. काम बंद, लाँगमार्चनंतरही अधिकारी, प्रशासनावर परिणाम झाला नाही तर, संघटनेने दि. ९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा