सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित महिला बैठकीत अर्चना घारे यांनी महिला भगिनींशी साधला. या वेळी अनेक महिला भगिनींनी आपल्या समस्या अर्चना घारे यांच्या समोर मांडल्या.
राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाने कायमच महिलांच्या हिताची जपणूक केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण, सैन्यदलामध्ये 10 टक्के आरक्षण, महिला आयोगाची स्थापना असे अनेक क्रांतिकारी निर्णय आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी घेतले. तळ कोकणातील महिलांच्या समस्या देखील आपण राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सोडवू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी उपस्थित महिला भगिनींना दिला.
कार्यक्रमाचे आयोजन राशप सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्षा नितिषा नाईक यांनी केले होते. यावेळी राशप सावंतवाडी शहराध्यक्षा सायली दुभाषी, राशप युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, राशप युवती काँग्रेसच्या सुधा सावंत, यांसह माजगाव – हरसावंतवाडा येथील असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.
तसेच या कार्यक्रमासाठी माजगाव – हरसावंतवाडा व परिसरातील प्रिया सावंत, सपना गावडे, भावना सावंत, मंजिरी राणे, जान्हवी सावंत, प्रणिता सावंत, नेहा गावडे, संजना नाईक, दीप्ती कोरगावकर, रेवती सावंत, प्रेमलता सावंत, लक्ष्मी पिंगुळकर, दीप्ती गाड, विनिता सावंत, आरोही भिडये, रेश्मा वारंग, संचिता सावंत, अर्पिता माने, सेजल माळकर, चंद्रकला सावंत, मंगला सावंत, रोशनी निब्रे, प्रिया गुरव अमिषा वारंग, सुजाता धुरी यांसह असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.
दरम्यान यावेळी उपस्थित महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे – परब यांनी विशेष मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानत सातत्याने मार्गदर्शन करण्याची विनंती केली.