You are currently viewing आला श्रावण

आला श्रावण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम भावगीत*

 

*आला श्रावण*

 

मन गाते गोड गाणं

आला श्रावण श्रावण।।धृ।।

 

नभ सावळे दाटती

रवीकिरणे उजळती

इंद्रधनूची कमान।।१

 

न्हाली अंगोपांगी धरा

बरसल्या मुक्त धारा

कोंबाची ती उगवण।।२

 

सय येते माहेराची

आई मूर्ती वात्सल्याची

डोळे भरती पाण्यानं।।३

 

साज हिरवा लेऊन

रूप दिसे हे देखणं

झाले धुंद माझे मन।।४

आला श्रावण श्रावण….💦

 

🌧️०००००🌧️०००००🌧️

 

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा